News Cover Image

डाॅ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

डाॅ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
पेठ, ता. २६ - डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील आर. एम. यांच्या हस्ते विद्यालयात ध्वजावरण करण्यात आले. त्यानंतर उपप्राचार्य श्रीमती पवार जे.पी यांच्या हस्ते स्काॅउट- गाईड ध्वजाचे ध्वजावरण करण्यात आले. नंतर कर्मवीर दादासाहेब बिडकर यांची प्रतिमा, डाॅ. विजयजी बिडकर व स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरीक श्री बापूसाहेब पाटील, हेमंत सातपुते, मनोज गुंजाळ विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री सागर ए.एम. पर्यवेक्षक श्री केला डी.जी., व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे उपप्राचार्य श्री वेढणे पी.अार. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वसतिगृह अधिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पेठ शहरातुन वेगवेगळ्या घोषणांच्या गजरात विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. यात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.