डॉ. विजय बिडकर विद्यालय, पेठ येथे ५ वी ते १० वीच्या विद्यार्थिनींना HPV लस देण्यात आली.
पेठ, दि. १९- शारदा महिला मंडळ पेठ व डांग सेवा मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने व कॅन्सर पेशंटस् एड असोशियशन (CAPP) यांच्या सहकार्याने डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे ५ वी ते १० वी च्या विद्यार्थिनीसाठी HPV लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक मा. डॉ. नुपूर खरे मॅडम, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. हेमलताताई बिडकर, तर प्रमुख पाहुणे मा. डॉ. संगीता लोढा मॅडम, मा. सतीश बोरा सर, मा. प्रिया मॅडम, मा. मिस नाझिया खान हे होते. यात ५ वी ते १० वी च्या एकूण ५०० विद्यार्थिनींना लस देण्यात आली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील आर. एम. उपमुख्याध्यापक श्री मोरे एम. एस., पर्यवेक्षक श्री केला डी. जी. श्री वेढणे पी आर. उपस्थित होते. सर्व शिक्षकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला.