डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
पेठ-दिनांक -०४/०१/२०२५ रोजी डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ,येथे कर्मवीर दादासाहेब बिडकर स्मृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आदिवासी विकास विभाग आयुक्त कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी मा.श्री आर.आर.पाटील हे उपस्थित होते.तसेच डांग सेवा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा मा.हेमलताताई बिडकर संस्थेच्या सचिव मा.मृणालताई जोशी,मा.श्री श्याम जोशी मा.सामिधाताई जोशी संचालक श्री.देशपांडे सर,श्री.चंद्रात्रे सर,अनिल पंडित व महेश डबे,मनोज गुंजाळ मुख्याद्यापक श्री आर.एम.पाटील उपमुख्याध्यापक श्री एम.एस.मोरे पर्यवेक्षक श्री डी.जी.केला व उपप्राचार्य श्रीमती व्ही.सी.आचार्य हे प्रमुख उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करण्यात आले.त्यानंतर ध्वजारोहण,क्रीडाज्योत प्रज्वलन,शांतीदूत संदेश ,सामुहिक संचलन व क्रीडा शपथ घेण्यात आली.यावेळी मा.ताईसाहेब यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेचा हेतू व उद्देश सांगितला.तसेच खेळाडूंनी वेगवेगळी प्रात्यक्षिक सदर केले.मा. प्रकल्प अधिकारी श्री.पाटील साहेबांनी ही सर्व खेळाडूना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.सोनवणे डी.एन.व श्री.वाघमारे जे.एच.यांनी केले.
स्पर्धेचा निकाल :-कबड्डी मुले प्रथम -गिरिजादेवी प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा शिंदे दिगर द्वितीय -सिद्धेश्वर प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा सुळे. कबड्डी मुली प्रथम -माध्यमिक विद्यालय बार्हे द्वितीय -जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर